महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

पीसीसीओईआर येथे शनिवारी आशियाई परिषदचे उद्घाटन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च च्या वतीने आयईईई महाराष्ट्र सेक्शन च्या सहकार्याने दोन दिवसीय “एशियन कॉन्फरन्स ऑन इनोवेशन इन इमर्जिंग टेक्नॉलॉजी (एएसआयएसीओएनएफ) २०२६” या आशियाई परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी, (दि. २९ ऑगस्ट) सकाळी ८.४५ वाजता, आकुर्डी येथील पीसीईटी कॅम्पस मध्ये मुंबईतील ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे डॉ. शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यावेळी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे संचालक डॉ. केतन कोटेच्या, कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे संशोधन संचालक डॉ. प्रमोद पाटील मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन सत्रात पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी आणि उद्योजक जयश जगताप मार्गदर्शन करणार आहेत. समन्वयक डॉ. राहुल मापारी स्वागत आणि पीसीसीओईआरचे इ अँड टीसी विभाग प्रमुख डॉ. किरण नाप्ते हे आभार मानतील.

या परिषदेचा समारोप ऑनलाईन पद्धतीने सोमवारी होणार आहे यामध्ये सुचिथ अरेला, सोमू सूर्यनारायणन हे “एआय मधील भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे प्रवेशद्वार” या विषयावर मार्गदर्शन करतील.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button