महाराष्ट्रकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन

लहानग्या रेवा कुंभार हिने ओडिसी नृत्याद्वारे वेधले लक्ष

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६) भारतीय अभिजात नृत्यकला व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात फार मोलाची भर घालते. नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती येते. मनाची एकाग्रता वाढून शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते. नृत्यकलांमध्ये संस्कृती संवर्धनाची क्षमता असून, संस्कारक्षम तरुण पिढीही निर्माण होते असे मार्गदर्शन “नृत्योपासना भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यालय” च्या संस्थापक वरदा वैशंपायन यांनी केले.

“नृत्योपासना भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यालय” चे स्नेह संमेलन पिंपरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी वैशंपायन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ निरुपणकार रविंद्रजी पाठक व स्नेहल सोमण, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी भरत नाट्यम आणि ओडिसी नृत्य शिकणाऱ्या मुलींनी सादरीकरण केले. वरदा वैशंपायन यांनी सर्वात कमी वयाची शिष्या रेवा कुंभार आणि आर्णा गुरु, हंसिनी रमेश, हर्षिता बिस्वाल, योगिता भसीन यांच्या समवेत ओडिसी नृत्य सादर केले. ओडिसी शिकणाऱ्या मुलींमध्ये रेवा ही वयाने सगळ्यात लहान विद्यार्थिनी होती. लहान वयात हे नृत्य शिकायला सुरुवात करून रंगमंचावर तिने सुंदर नृत्य सादर केले हे कौतुकास्पद आहे. भरतनाट्यम शिकणाऱ्या ४० विद्यार्थीनींनीही आपली कला सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

ओडिसी नृत्य सादरीकरणात, चौक आणि त्रिभंगी पदन्यास, बटू ही नृत्य सादर झाली. भरतनाट्यमच्या विद्यार्थीनींनी मल्लरी, पुष्पांजली, अलारिपु, जतीस्वरम, शब्दम्,कीर्तनम, अंबाष्टक, जावळी, कृष्ण भजन – जरा इतना बात दे कान्हा, बारा ज्योतिर्लिंग श्लोकम, तिल्लाना आणि अभंग या नृत्य रचना सादर केल्या त्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.


——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button