महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

“उद्धव श्री” पुरस्काराचे वितरण शुक्रवारी खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते – चेतन पवार

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १९ ऑगस्ट २०२६) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामांकित व्यक्तींचा “उद्धव श्री पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या “उद्धव श्री पुरस्कार २०२६” चे वितरण राज्यसभा खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

शुक्रवारी (सायंकाळी ४ वाजता), ताथवडे बीआरटी रोड येथील सुखवाणी फार्म, नरसिंह मंदिराजवळ येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उपनेत्या विशाखाताई राऊत, महाराष्ट्र संघटिका रंजनाताई नेवाळकर, पुणे शहर शिवसेना प्रमुख वसंत मोरे, पुणे शहर माजी प्रमुख संजय मोरे, मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, पुणे शहर संपर्क संघटिका मेघना काकडे माने, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख लतिकाताई पाष्टे तसेच गजानन थरकुडे, विजय सुळे, सुनील सावंत आदीं प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

यावर्षीचा “उद्धव श्री पुरस्कार २०२६” डॉ. संतोष लाटकर (वैद्यकीय), डॉ. रोहन काटे (वैद्यकीय), प्रा. तुकाराम पाटील (साहित्यिक), काशिनाथ नखाते (कामगार), प्रीती वैद्य (सामाजिक), चांद पाशा अहमद हुसेन तांबोळी (क्रीडा) पै. योगेश्वर तापकीर (क्रीडा) भाग्यश्री मोरे (सामाजिक), रामदास काटे (कृषी) आणि डॉ. संजीव कुमार पाटील (कला) यांना जाहीर करण्यात आला आहे अशी ही माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख चेतन पवार यांनी दिली आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button