महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

समाजाचे ऋण फेडण्यासाठी अर्थपूर्ण योगदान द्या – कर्नल ऋषिकेश धोत्रे

पीसीयू मध्ये नेतृत्व, राष्ट्रसेवा आणि वैयक्तिक विकासावर मार्गदर्शन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ३ ऑगस्ट २०२६) मातृभूमी, कुटुंब आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने आपले अर्थपूर्ण योगदान द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवा हे ध्येय ठेवून शिस्त पालन करून समृद्ध जीवन घडवावे असे मार्गदर्शन कर्नल ऋषिकेश धोत्रे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात कर्नल ऋषिकेश धोत्रे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पीसीयू संचालक डॉ. रामदास बिरादार, परीक्षा नियंत्रक डॉ. परिमाला मणी, प्रा. महेश जगताप, प्रा. प्रेरणा जैन, प्रा. मनोहर कलगुंडे तसेच प्रथम वर्ष प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

कर्नल ऋषिकेश धोत्रे यांनी त्यांचे सैन्यातील अनुभव सांगितले. कठोर प्रशिक्षण आणि सियाचीन सारख्या प्रतिकूल ठिकाणी कामाचा अनुभव घेऊन व्यक्तिमत्व विकसित झाल्याचे सांगितले. जीवनात शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबू नये, प्रतिकूल परिस्थिती मध्ये देखील स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता विकसित करावी आणि मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. संरक्षण दल किंवा नागरी सेवा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध अभ्यास साहित्याचा योग्य वापर करावा, नियमित दिनक्रम पाळून आणि सातत्यने अभ्यास केला पाहिजे. नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व विकसित करावे, चांगले मित्र जोडावेत, इतरांना मदत करण्याची वृत्ती अंगीकारावी तसेच विविध संस्कृतींचा सन्मान करत स्वतःला जबाबदार नागरिक म्हणून घडवावे असेही कर्नल धोत्रे सांगितले.

प्रश्नोत्तरांमध्ये विद्यार्थ्यांनी सीडीएस परीक्षेची तयारी, मानसिक बळकटी आणि तणाव व्यवस्थापन, नेतृत्वातील आव्हाने, परदेशातील करिअरच्या संधी, रणांगणावरील अनुभव तसेच आत्मपरीक्षणाची प्रभावी पद्धत यांसारख्या विविध विषयांवर प्रश्न विचारले.

स्वागत डॉ. रामदास बिरादार, सूत्र संचालन प्रा. डॉ. शितल सोनार आणि आभार प्रा. मनोहर कलगुंडे यांनी मानले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त व पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीइटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीयू चे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button