महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

माता, पिता व गुरुजनांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करा – हर्षवर्धन पाटील यांनी केले

पीसीयुच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये भावी अभियंत्यांचे उत्साहात स्वागत

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २९ जुलै २०२६) जीवनातील महत्त्वाची चार वर्षे अभियांत्रिकीची पदवी मिळवण्यासाठी द्यावी लागतात. पीसीयू मधील उच्च विद्या विभूषित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा पाया उभारावा, त्यासाठी पीसीईटीने गुणवत्ताधिष्ठित शिक्षणव्यवस्था उभारली आहे, त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या माता, पिता व गुरुजनांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करावे असे मार्गदर्शन पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ कॅम्पस मध्ये स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ हा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रथम वर्ष बीटेक च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, लार्सन अँड टुब्रो कंपनीचे जनरल मॅनेजर के. वेंकटेशन, पीसीयुचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, पीसीयूचे सल्लागार डॉ. शितलकुमार रवंदळे, संचालक, आऊटरीच अँड ॲडमिशन्स प्रमुख डॉ. रामदास बिरादार आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पीसीयूच्या उत्कृष्ट पायाभूत सुविधांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शिस्त, क्रीडा, सहशैक्षणिक उपक्रम आणि लिंक्डइन सारख्या व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून प्रत्येक संधीचे सोने करावे असे सांगितले.

के. वेंकटेशन यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीची जबाबदारी घ्यावी. अभियांत्रिकीची मूलभूत तत्त्वे आत्मसात करून समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करावी. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनरेटिव्ह एआय चा प्रभावी वापर करण्याचा सल्ला दिला.

डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले की, विकसित भारत चे ध्येय साध्य करण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रात जास्त संधी आहेत. पीसीईटीचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४००० पेक्षा जास्त शिक्षण, संशोधन आणि उद्योग संस्थांशी संपर्क आहे. यातील बहुतांशी संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, व्यवसाय नोकरीसाठी मार्गदर्शन व गुंतवणूक सल्ला उपलब्ध करून देण्यात येतो. उदयोन्मुख तंत्रज्ञान, चिकित्सक विचारसरणी, ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, प्रोग्रामिंग कौशल्ये याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असेही डॉ. रवंदळे यांनी सांगितले.

पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी अभियांत्रिकीच्या चौथ्या बॅचचे स्वागत केले. येथील उद्योगाभिमुख शिक्षण, आंतरराष्ट्रीय सहकार्य, परदेशी भाषा शिक्षण आणि लवकरच सुरू होणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्सची माहिती दिली. पीसीयू मधील अत्याधुनिक प्रयोगशाळा, रोबोटिक्स, सेमी कंडक्टर तंत्रज्ञान, उद्योग सहकार्य, परदेशी भाषा शिक्षण, वसतिगृह व क्रीडा सुविधा, महिंद्रा आणि जपान, दक्षिण कोरिया येथील अनेक उद्योगांशी असलेल्या भागीदारीचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल असे सांगितले.

डॉ. रामदास बिरादार पीसीईटीची शैक्षणिक परंपरा, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापक, संशोधनाच्या संधी आणि मजबूत प्लेसमेंट व्यवस्था यांची माहिती दिली.

हा कार्यक्रम पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन प्रतिनिधी सदस्य नरेंद्र लांडगे आणि अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button