महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

शनिवारी महात्मा फुले विद्यालयात शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव – वसंत लोंढे

क्षितिजय नप्ते याचा राज्यात प्रथम क्रमांक

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ०८ जुलै २०२६) भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळाच्या महात्मा फुले विद्यालयातील क्षितिजय नप्ते याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच विद्यालयाच्या पाचवी इयत्तेतील ३ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणि २० विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तसेच आठवी इयत्तेतील २ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षिका मंगल आहेर – गावडे यांनी मार्गदर्शन केले या सर्वांचा गुणगौरव सोहळा शनिवारी, (दि. ११) सकाळी ११ वाजता शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वसंत (नाना) लोंढे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, स्थानिक नगरसेवक तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी संगीता बांगर, महात्मा फुले विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुलभा चव्हाण माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मोहन वाघुले आदी उपस्थित राहणार आहेत.

संस्थेचे उपाध्यक्ष श्याम लोंढे, अनिल लोंढे, सोमनाथ रासकर, सचिव संतोष लोंढे, उपसचिव संदीप लोंढे, खजिनदार वृषभ रासकर, सह खजिनदार दीपक लोंढे, महेश लोंढे, हिशोब तपासणीस विजय लोंढे, सह हिशोब तपासणीस अतुल रासकर, सभासद तुषार लोंढे, संकेत लोंढे, सिद्धेश लोंढे, अमित लोंढे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे.

इयत्ता पाचवी मधील क्षितिजय प्रवीण नप्ते याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९० गुण प्राप्त करत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वेदांत राजेंद्र गोरडे याने राज्यात चौथा, तर तनिष्का चांगदेव केदार हिने राज्यात १३ वा क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वसंत लोंढे यांनी दिली.

महात्मा फुले विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेतील ही सलग २६ व्या वर्षीची उल्लेखनीय कामगिरी असून, गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ दरवर्षी २० पेक्षा अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या सातत्यपूर्ण यशामागे विद्यालयातील आदर्श शिक्षिका मंगल आहेर गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. त्या गेल्या २७ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४०० हून अधिक विद्यार्थी जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यामुळे महात्मा फुले विद्यालयाने राज्यभर ‘शिष्यवृत्ती शाळा’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
———————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button