महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार

शेकडो शिवसैनिकांसह पवार यांची मातोश्री वर भेट

Spread the love

पिंपरी, पुणे ( दि. २ जुलै २०२६) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनंतर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत आहेत असा विश्वास शहर प्रमुख चेतन पवार यांनी मातोश्री येथे दिला.

गुरुवारी (दि. २ जुलै) सकाळी चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईत मातोश्री वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेकडो शिवसैनिक आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाशी निष्ठा कायम असल्याचे सांगितले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे. यावेळी प्रमुख पदाधिकारी आणि चेतन पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षावर निष्ठा कायम असल्याची हमी दिली.

पिंपरी चिंचवड शहरातील एकही शिवसैनिक किंव्हा पदाधिकारी पक्ष सोडणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत संघटनात्मक पातळीवर शाखा, बूथ स्तरावर जनसंपर्क वाढविणार आणि नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणार आहोत. शहर पातळीवर संघटना अधिक सक्षम करून पुढील काळात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून जोमाने काम करण्याचा निर्धारही सर्वांनी व्यक्त केला असल्याचे चेतन पवार यांनी सांगितले आहे.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button