अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध – राहुल डंबाळे
३० जून चलो मुंबई विधानसभेला घेराव


पिंपरी, पुणे (दि. २३ मे २०२६) अनुसूचित जातीच्या ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील दलित समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करून जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. या संदर्भात ‘बार्टी’ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) कडे आतापर्यंत सुमारे ८० हजार पेक्षा ई-मेल प्राप्त झाले असून, त्यापैकी हजारो ई-मेल हे या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. बार्टीकडे आलेल्या या हजारो आक्षेपांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा मुंबईत ३० जून रोजी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला घेराव घालण्याचे आंदोलन पुकारण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीचे संयोजक राहुल डंबाळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

३० जून रोजी मुंबईत होणाऱ्या या महा-घेराव आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी पुनर्विलोकन समितीच्या वतीने राज्यात नियोजन बैठका सुरू आहेत. वस्ती, गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर समाजबांधवांना एकत्र करून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या बैठकांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. बहुतांश समाजाचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे. सरकारने एकतर्फी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, तर ३० जून रोजी मुंबईत होणारा विधानसभेचा घेराव हा ऐतिहासिक असेल इशारा राहुल डंबाळे आणि पुनर्विलोकन समितीने दिला आहे.
———————————————————————–
अधिक माहितीसाठी
राहुल डंबाळे – 9822917119
संयोजक,
महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समिती.
———————————————————————–



