महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

पीसीयू मध्ये फिडेल सॉफ्टटेक द्वारे स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब सुरू – ज्ञानेश्वर लांडगे

पीसीयू आणि फिडेल सॉफ्टटेक यांच्या मध्ये सामंजस्य करार

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.१५ मे २०२६) विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांसोबत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण प्रणाली मध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्या अंतर्गत ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब’ची स्थापना करण्यासाठी फिडेल सॉफ्ट टेक सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार एआय सक्षम विद्यापीठ बनण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली.

आकुर्डी येथील ट्रस्ट कार्यालय मध्ये पीसीयू आणि फिडेल सॉफ्टटेक कंपनी यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, आयटी आणि आयटीइएस विभाग प्रमुख प्रा. रामकृष्ण वडाली आणि फिडेल सॉफ्टटेक लि. चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी खजिनदार शांताराम गराडे यांनी सांगितले की, पीसीयू मध्ये लवकरच फिडेल सॉफ्टटेक द्वारे स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब सेंटर सुरू होईल. विद्यार्थ्यांना प्रकल्प आणि उद्योग संबंधित साधनांद्वारे डेटा ॲनालिटिक्स, डेटा इंजिनिअरिंग आणि बिझनेस इंटेलिजन्समध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. यात तज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, असाइनमेंट्स, मूल्यांकन आणि प्रमाणपत्रे यांचा समावेश आहे. या लॅब मुळे विद्यार्थ्यांना डेटा ॲनालिटिक्स, डेटा इनजेशन आणि इटीएल (एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड) प्रक्रिया, प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग आणि एआय मधील उच्च मागणी असलेल्या करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होईल असेही शांताराम गराडे यांनी सांगितले.

स्वागत प्रा. रामकृष्ण वडाली आणि आभार ओ. एस. डी. डॉ. योगेश भावसार यांनी मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button