महाराष्ट्रकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराजकीयराष्ट्रीयसामाजिक

‘प्राईड वर्ल्ड सिटी’त बहुआयामी संयुक्त जयंती महोत्सव साजरा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १६ एप्रिल २०२६) प्रबुद्ध विचार मंच, प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली आयोजित संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले अशा थोर महापुरुषांना मानवंदना देण्यात आली.

प्रबोधनात्मक कार्यक्रम, कलासादरीकरण, महिलांचा लक्षणीय सहभाग, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे बाबासाहेबांचे अफाट पुस्तक प्रेम अधोरेखित करणारे भव्य पुस्तक प्रदर्शन व सायंकाळी रोषणाईने सजलेल्या रथामधून महापुरुषांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अशा वैविध्यपूर्ण व भरगच्च कार्यक्रमांनी संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. ‘मॅनहॅटन कम्युनिटी हॉल’ येथील पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. विशाल घोरपडे यांनी केले. प्रबोधन, राजकारण, इतिहास, क्रीडा, आरोग्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा त्यात समावेश होता.

‘लाँग आयलँड कम्युनिटी हॉल’मध्ये नंदा सोनटक्के व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. २ ते १८ वर्षे वयोगटापर्यंच्या मुलांनी चित्रकला, गायन, नृत्य, पियानो वादन, वक्तृत्वकला यासह सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत लघुनाट्य अशा अनेक कला सादर केल्या. अश्विनी कापुरे (उपाध्यक्षा, कोटक बँक), राजनंदिनी भागवत (सहायक आयुक्त), हर्षल कोतले (उपायुक्त, जीएसटी), डॉ सुखदेवे (मा. व्यवस्थापक, आरबीआय), डॉ. सोनिका कापुरे (वैद्यकीय अधिकारी, रुबी हॉल), डॉ. सुरेश कठाणे, डॉ. विशाल घोरपडे, डॉ. स्मिता वानखेडे, डॉ. अजय मोहोद, गौरव निकम (सामाजिक न्याय विभाग), संतोष जाधव, ॲड. अतुल्य राठोड (चेअरमन, लाँग आयलँड सोसायटी), संजय पवार (सामाजिक कार्यकर्ते), विश्वास बाबरे (युवा व्याख्याते) यांनी आपले प्रबोधनात्मक विचार मांडले.

प्रीती भालेराव आणि जयश्री आराख यांनी सूत्र संचालन केले. रात्री आकर्षक रोषणाईने सुसज्ज अशा रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमा विराजमान करून मिरवणूक काढण्यात आली. त्याची सुरूवात प्रतीक पाटील (प्राईड ग्रुप) यांच्या हस्ते झाली. माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर, नगरसेविका श्रुती डोळस यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार केले.

प्रबुद्ध विचार मंचचे कार्यकर्ते सुचित ओव्हाळ, अमरदीप कोतले, अक्षय कांबळे, शुभम रोकडे, वैभव पवार, रुपेश सोनटक्के, उशांत करमणकर, अभिलाष निकोसे, निखिल भालेराव, सुयोग हिरे, शैलेश सुरवाडे, पप्पू तिवडे, सतीश पडघणे, विश्वास बाबरे, यश जाधव, प्रीती भालेराव, जयश्री आराख, राजनंदिनी भागवत-कोतले, स्मिता तांबे, किरण ओव्हाळ, वर्षा दवणे, विद्या धाकडे, प्रज्ञा जगताप-कांबळे, अश्विनी रोकडे, पूनम सुरवाडे, स्वाती तिवडे, ज्योती जाधव, प्रज्ञा जाधव, शितल भैरमदगीकर, विशाखा कोतले, विजया बच्छाव आदींनी परिश्रम घेतले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button