
६ एप्रिल २०२६….. हा दिवस दिशा सोशल फाऊंडेशनच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरतो. स्थापनेपासून ते आजपर्यंतचा दिशाचा तब्बल दोन दशकांचा हा कालखंड सामाजिक बांधिलकी, ज्ञानाची, प्रबोधनाची अखंड धडपड आणि विधायक कार्याची साक्ष देणारा आहे.

६ एप्रिल २००६ रोजी गुढीपाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर आम्ही काही तरुण मित्रांनी एकत्र येऊन दिशा सोशल फाऊंडेशनची स्थापना केली.

कोणतेही ठोस नियोजन नव्हते. विशिष्ट असा कार्यक्रम डोळ्यासमोर नव्हता. मात्र, समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याची प्रामाणिक भावना हाच खऱ्या अर्थाने संस्थेचा पाया होता.

प्रारंभीच्या टप्प्यातील वाटचालीत अनेक अडचणी आल्या, त्याचा सामना करत संघभावना आणि दृढनिश्चयाच्या जोरावर दिशाने आपली वाटचाल आजपर्यंत कायम ठेवली आहे.

पिंपरी-संततुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात तत्कालीन खासदार व पिंपरी-चिंचवडचे माजी आयुक्त श्रीनिवास पाटील यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक ‘दिशा’च्या स्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाला. तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त दिलीप बंड, महापौर मंगलाताई कदम या प्रमुख पाहुण्यांसह मोठा जनसमुदाय या सोहळ्यासाठी उपस्थित होता.

पुढील प्रवासात दिशा फाऊंडेशनशी अनेकजण जोडले गेले, तसतसे ‘दिशा’चा विस्तार होत गेला. अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. एकापाठोपाठ एक वरचढ असे चांगले, नियोजनबध्द आणि भव्य-दिव्य कार्यक्रम होत गेले. ‘दिशा’ची लोकप्रियता आणि व्याप्ती वाढत गेली. इतकी की, राज्यस्तरीय पातळीवर दिशा फाऊंडेशनची महती पोहचली.

‘दिशा’च्या व्यासपीठावर विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास….

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, अमर साबळे, गजानन बाबर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, अश्विनी जगताप.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, आयएएस तुकाराम मुंढे, डॉ. श्रीकर परदेशी, तेव्हाचे पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, महापालिका आयुक्त दिलीप बंड, राजीव जाधव, आशिष शर्मा, प्रसिध्द व्याख्याते नितीन बानुगडे पाटील. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, डॉ. सदानंद मोरे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रामचंद्र देखणे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रविण दवणे, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, सुधीर गाडगीळ, विठ्ठल वाघ, संभाजी भगत, बाळासाहेब अनास्कर, यजुर्वेद महाजन.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. उर्जिता कुलकर्णी, रमा मराठे, इंदुमती जोंधळे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, निवेदिता जोशी, मुक्ता बर्वे, प्रियदर्शिनी इंदलकर, सोनाली कुलकर्णी, पर्ण पेठे, कादंबरी कदम.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, जॉनी लीव्हर, भरत जाधव, सिध्दार्थ जाधव, शंतनू मोघे, देवदत्त नागे, संकर्षण कऱ्हाडे. प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, समर नखाते, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, केदार शिंदे, प्रविण तरडे, भाऊराव कऱ्हाडे, कार्तिक केंढे, निर्माते विश्वास जोशी, राहुल भंडारे…. अशी मान्यवरांची बरीच मोठी यादी आहे.

दिशा फाऊंडेशनच्या वतीने २०१७ पासून सुरु करण्यात आलेला ‘दिवाळी फराळ’ हा आगळा वेगळा उपक्रम ठरला आहे. राजकीय पक्षांचे बडे नेते, प्रसिध्द अभिनेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी ‘दिवाळी फराळ’च्या निमित्ताने एकत्र येतात. या आनंददायी सोहळ्यात विचारांचे आदान-प्रदान होते. गप्पांचे फड रंगतात.

द्विदशकपूर्ती साजरी करत असतानाच पुढील वाटचालीस दिशा फाऊंडेशन नव्या उमेदीने सज्ज आहे.

ज्ञान, प्रबोधन आणि समाजहिताचा वसा जपत परिणामकारक उपक्रम राबवण्याचा संस्थेचा निर्धार कायम आहे. यापुढील प्रवासातही हीच प्रेरणा आणि हीच दिशा कायम राहील. सर्वांचे सहकार्य असेलच, याची खात्री आहे.

————————————————————————-



