महाराष्ट्रकलाक्रीडाचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीमनोरंजनराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

एसबीपीसीओएडी चा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २७ मार्च २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन (एसबीपीसीओएडी) येथे वार्षिक सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी कान्हेवाडीच्या सरपंच स्वाती येवले, ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया राक्षे, परीक्षक व्यावसायिक गायिका सुलोचना पवार, परीक्षक व्यावसायिक नृत्यदिग्दर्शक अजय चावरिया, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, प्रा. ऋतुराज कुलकर्णी, प्रा. निकिता गायकवाड, लक्ष्मण तोरगळे, किसन काळे, प्रा. अनिश कुमार करिया, प्रा. काजल माहेश्वरी, विद्यार्थी आणि प्राध्यापक, कर्मचारी आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी फन फेअर, गायन, नृत्य, पारंपरिक वेशभूषा दिन, नाटक तसेच वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या यामध्ये सांस्कृतिक, सर्जनशील व क्रीडा कौशल्यांचे सादरीकरण केले. पुनर्वापरयोग्य व टाकाऊ साहित्याचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली. रोमन, ग्रीक, मेवाड आणि इजिप्शियन अशा ऐतिहासिक संस्कृती व राजवंशांवर आधारित संकल्पना विद्यार्थ्यांनी सर्जनशील स्थापत्य व प्रदर्शनांच्या माध्यमातून सादर केल्या. सर्व हाऊसमधील स्पर्धेनंतर ग्रीन हाऊसने सांस्कृतिक करंडक पटकावला, तर यलो हाऊस द्वितीय क्रमांक, ब्लू हाऊस तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक रेड हाऊस यांना देण्यात आला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांचे वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button