महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

पेटंट बाबत जागरूकता निर्माण व्हावी – डॉ. हरीश तिवारी

पीसीसीओइआर येथे “इंडियन पेटंट” राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ मार्च २०२६) शैक्षणिक क्षेत्रातील संशोधक व नावीन्यपूर्ण नव संकल्पना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर), पेटंट कायदे आणि पेटंट ड्राफ्टिंग याबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. यासाठी पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई हे नेहमी आग्रही असतात, असे पीसीसीओइआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.

पीसीसीओइआर मध्ये विद्यार्थ्यांसाठी व संशोधकांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच्या संशोधकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या संशोधनाचे आणि स्वामित्व हक्कांचे संरक्षण करावे असेही मार्गदर्शन पीसीसीओइआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) रावेत येथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलच्या सहकार्याने “इंडियन पेटंट – युटिलिटी पेटंट्स व डिझाईन पेटंट्स” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपसंचालक प्रा. डॉ. राहुल मापारी, आर.अँड डी. सहयोगी प्रमुख प्रा. डॉ. किशोर भंगाळे, प्रा. डॉ. राहुल बावणे, प्रा. डॉ. सुदर्शन बोबडे, डॉ. शिवगंगा गव्हाणे, आदींसह प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत २०० संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

प्रा. डॉ. किशोर भंगाळे आणि प्रा. डॉ. राहुल बावणे यांनी संस्थेच्या बौद्धिक संपदा हक्क बद्दल माहिती दिली. तसेच पेटंट च्या प्रणालीची मूलभूत तत्त्वे, कायदेशीर तरतुदी आणि संशोधक व नवोन्मेषकांसाठी बौद्धिक संपदा संरक्षणाचे महत्त्व, पेटंट ड्राफ्टिंग, पेटंट दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया, क्लेम्स कसे लिहावेत, पेटंट अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियात्मक बाबी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रा. डॉ. सुदर्शन बोबडे यांनी पीसीसीओइआर मध्ये राबविण्यात येणाऱ्या संशोधन व विकास उपक्रम, डिझाईन पेटंट्सची संकल्पना, त्याचा व्याप आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या डिझाईनचे संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, उपसंचालक प्रा. डॉ. राहुल मापारी यांनी सहभागी प्राध्यापकांचे व आयोजकांचे अभिनंदन केले.

सर्व सहभागींना संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्रा. डॉ. शिवगंगा गव्हाणे यांनी आभार मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button