महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

पीसीसीओइ करते सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे काम – डॉ. निळकंठ चोपडे

"गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार्स" स्मरणिकेचे शानदार प्रकाशन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ मार्च २०२६) पीसीसीओइच्या माजी विद्यार्थ्यांनी नोकरी, उद्योग, व्यवसायात जे यश मिळवले आहे. त्याचा पीसीसीओइ व्यवस्थापन आणि सर्व प्राध्यापकांना अभिमान वाटतो. या माजी विद्यार्थ्यांमुळे आमचीच प्रतिमा उज्ज्वल होत आहे, येथे चांगली नोकरी, व्यवसाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाते. त्याच बरोबर एक जबाबदार सुसंस्कृत आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवून देशाच्या विकासात हातभार लावणारा नागरिक घडवण्याचे काम केले जाते. येथे ज्ञान, कौशल्य आधारित प्रकल्प राबवित विविध उपक्रम आणि मॉक टेस्ट इंटरव्ह्यू घेतात. यामुळे विद्यार्थी तयार होतात असे प्रतिपादन पीसीसीओइचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओइ) येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार्स” या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पीसीइटीचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख व या मेळाव्याचे मुख्य समन्वयक डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, उत्कृष्ट करिअर करण्यासाठी स्वतःला एखाद्या विषयात तज्ञ करून घेतले पाहिजे. मग तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. एकदा यश आले म्हणून थांबू नये तर इतरांना मार्गदर्शन करत प्रोत्साहन द्यावे. तुम्ही इंजीनियरिंग केले असले तरी तुमचा इंटरेस्ट ज्या गोष्टीत असेल त्या गोष्टी तुम्ही तुमचं करिअर बदलू शकता. बदल करताना कधीही आपला आत्मविश्वास डळमळू देऊ नका. तुम्ही माजी विद्यार्थ्यांनी जे नेटवर्क बनवले आहे, तेच “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओई स्टार्स” आहेत. ही आज प्रकाशन करण्यात आलेली स्मरणिका इतर सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल. यामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, करियर प्रवास आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला आहे.

यावेळी पीसीसीओइ माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डेनिस थॉमस, उपाध्यक्ष बसवराज वामा, प्रसाद श्रीरामे, युवराज पवार, शबरीश नायर, प्रवीण भोर, सौरभ बेदमुथा, तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात आणि स्मरणिकेच्या संयोजनात सहभाग घेतलेले प्रा. हिना शर्मा, विजय टोपे, ऋषिकेश पांडे, पायल काळे, संदीप पिल्लेवार, निखिल सुरवडे, शैलेश गलांडे, तन्मय खांबेकर, स्फूर्ती देशमुख, डेझेंटा लोबो, मंगेश काळभोर आणि विद्यार्थी प्रतिनिधी निशांत कुलकर्णी, प्रसाद कोलते आणि पीसीसीओइचे देश, परदेशात विविध क्षेत्रात नोकरी उद्योग, व्यवसाय करणारे २०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओइ संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच “उद्योग व शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करणे” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. यामध्ये डेनिस थॉमस यांनी सांगितले की, इंटरशिप खूप महत्त्वाची असते. त्यातून खूप शिकायला मिळते. आम्ही काही प्रोजेक्ट करतो. त्यामध्ये दर तीन आठवड्यांनी नवीन गोष्टी समोर येतात. मी प्रत्येक वेळी नवीन गोष्टी शिकत राहतो. स्व-अध्ययन सुरु ठेवा आणि नेहमी स्वतःला अपडेट ठेवा हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

शबरीश नायर यांनी सांगितले की, आयआयटी हे क्षेत्र तुम्हाला लोकांशी कनेक्ट करण्यासाठी मदत करते. सेल्स मार्केटिंग ला तुम्ही टाळू शकत नाही. त्याला तुम्हाला सामोरे जावेच लागते. त्यामध्येही तुम्हाला अनेक चांगले अनुभव येतात आणि त्याचा फायदाच होतो.

प्रसाद श्रीरामे यांनी सांगितले की, जीवनात खूप चढ उतार येतात. त्यावेळी मी माझ्या कॉलेजला भेट देतो. येथे येऊन मला एक वेगळी ऊर्जा मिळते, त्यानंतर मी पुन्हा उभा राहतो. येथे केवळ इंजिनियर केले जात नाही, तर मानवता जपणारा माणूस घडविला जातो. या कॉलेज मुळे आमची सामाजिक जडणघडण झाली. एन. एस. एस कॅम्पमधून आम्ही जीवन मूल्य शिकलो.

प्रवीण भोर यांनी सांगितले की, प्रत्येकामध्ये एक वेगळी प्रतिभा असते. मराठी माणसाची प्रतिष्ठा मराठी भाषेत आहे. ही जपण्यासाठी मी गर्जे मराठी सोबत काम करतो.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button