महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

माजी विद्यार्थ्यांना मिळणारा मान हाच आमचा सन्मान – डॉ. किर्ती धारवाडकर

एसबीपीआयएमच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १५ मार्च २०२६) विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नोकरी, उद्योग, व्यवसायात एसबीपीआयएमचे माजी विद्यार्थी चमकदार कामगिरी करताना दिसतात. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मिळणारा मान सन्मान हा त्यांचे शिक्षक या नात्याने आमचा सन्मान आहे, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. आपले सर्व माजी विद्यार्थी सुसंस्कृत नागरिक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत आणि देशाच्या विकासात हातभार लावत आहेत. असे एसबीपीआयएम च्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर म्हणाल्या.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस.बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) या महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळाव्यात डॉ. धारवाडकर बोलत होत्या. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आकाश राऊत, सचिव हेमंत राजेस्थ, खजिनदार डॉ. अनिशकुमार कारिया आणि इतर समिती सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात १६१ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वांनी महाविद्यालयीन काळातील आठवणी आणि व्यावसायिक नेटवर्किंग यांचा अविस्मरणीय अनुभव सांगितला. “पिनॅकल” या माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणिकेचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने माजी विद्यार्थी विभागाचे उद्घाटन करण्यात आले. पिनॅकलमुळे माजी विद्यार्थ्यांचा एकमेकांशी दुरावलेला संवाद आणि सहभाग आता अधिक बळकट होईल असे डॉ. कीर्ती धारवाडकर म्हणाल्या.

निवडक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. भविष्यातील उपक्रमांविषयी आपली भूमिका मांडली तसेच मार्गदर्शन, इंटर्नशिप, प्लेसमेंट आणि संस्थात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

एसबीपीआयएम मधील आठवणींवर आधारित व्हिडिओ, नृत्य, नाटिका सादर करत अनुभव आणि जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा पुढील वर्षी असाच भव्य मेळावा घेण्याचे अभिवचन देत निरोप घेण्यात आला.

शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे, डॉ. स्वप्निल सोनकांबळे आणि डॉ. अनिषकुमार कारिया यांनी आयोजनात सहभाग घेतला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button