महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

हवामान बदल ओळखण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयोगी – डॉ. पीटर ग्राफमन

पीसीसीओई येथे इंद्रधनु आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅलेंज स्पर्धा संपन्न

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १० फेब्रुवारी २०२६) हवामान बदल हे सध्याचे सर्वात मोठे वैज्ञानिक आव्हान आहे. हवामान बदल ओळखण्यासाठी एआय हे तंत्रज्ञान उपयोगी आहे. पर्यावरणात आमुलाग्र बदल झाल्यामुळे अचानकपणे आपत्ती उद्भवते. त्यामुळे अति पर्जन्यवृष्टी, दुष्काळ, भूकंप, भूस्खलन अशी संकटे येऊ शकतात. यामुळे तलाव, धरणे, नदीकिनारी असणाऱ्या पूर संरक्षक सीमा भिंती या पायाभूत सुविधा विस्कळीत होऊ शकतात. जसे की, कॅटरिना चक्री वादळात मोठ्या संरक्षक बांधामुळे सुरक्षा होईल असे सर्वांचे मत होते. परंतु तो बांध अयशस्वी झाला उलट त्यामुळे शहराचे अधिक नुकसान वाढले असे अमेरिकेचे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. पीटर ग्राफमन यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) येथे आंतरराष्ट्रीय संबंध विभाग आयोजक आणि सीयुएनवाय सह आयोजक “इंद्रधनु – आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅलेंज २०२५ – २६” ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भारत, अमेरिका, मलेशिया, घाणा या देशांतील आंतरराष्ट्रीय संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी डॉ. पीटर ग्राफमन यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कॅलिफोर्निया विद्यापीठ चे प्रा. डॉ. प्रमोद खरगोनकर, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. रोशनी राऊत, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस डॉ. आर. व्यंकटेश्वरन, पुणे व्हिओआयएस डीजीएम विशाल जैन, गोदरेज कंपनीचे आर. अँड डी. प्रमुख संत रंजन, युएसए बीसीसी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क परमिता सेन, युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क डॉ. नील फिलिप, न्यूजेनच्या सुश्री भावना, डेटाफाय कंपनीचे हेमंत सेल्मोकर, व्योम लॉजिक एआय सीईओ चिराग त्रिवेदी आदी उपस्थित होते.

कॅलिफोर्निया विद्यापीठ प्रा. डॉ. प्रमोद खरगोनकर म्हणाले की, एआय हे तंत्रज्ञान हवामान बदलांच्या सर्व बाबींविषयी अचूक माहिती देऊ शकते. यापुढे एआय हे जनरल एआय, पॉवरफुल एआय आणि नंतर सुपर एआय असा प्रवास करत विकसित होईल. नंतर हे एक सामान्य आणि सामाजिक तंत्रज्ञान बनेल. ज्याचा उद्देश देखील सामान्य असेल. तसेच एआय क्रांतीशी तुलना, इंटरनेट, संगणक, मायक्रोप्रोसेसर, वीज, स्टीम इंजिन, प्रिंटिंग प्रेस या विविध विषयांवर देखील असे डॉ. खरगोनकर यांनी मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व विजेत्या टीम आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, इंद्रधनु हे जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारे एक शक्तिशाली व्यासपीठ आहे. ही स्पर्धा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय आणि १३ प्रकारच्या हवामान कृतीशी संबंधित होती. तसेच तंत्रज्ञान चलित एआय विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.

प्रास्ताविक करताना डॉ. रोशनी राऊत यांनी सांगितले की, ब्रॉंक्स कम्युनिटी कॉलेज, द सिटी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क, नुजेन इंटेलिजन्स, कॅपजेमिनी, आयईईई पुणे विभाग, इकोसॅन सर्व्हिस फाउंडेशन, द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन आणि पुणे एआयटी कम्युनिटी यांचे इंद्रधनू या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. यासाठी जून २०२५ मध्ये भारताबाहेरील एकूण १० संघ आणि भारतातील विविध १८ राज्यातील इतर संघ असे जगभरातून १००२ संघांनी आपल्या कल्पना नोंदवून सहभाग घेतला होता. यातील ४८१ संघांनी व्हिडिओ प्रोटोटाइप सादर केले. अंतिम फेरीसाठी १९ संघांची निवड झाली होती.

या स्पर्धेत विजेते खालील प्रमाणे :-
प्रथम क्रमांक :- “आयजीसी ४२५ बाईट्स पायरेट्स” यांना १ लाख रुपयांचे बक्षीस आणि एमआयटी अकादमी ऑफ इंजीनियरिंग यांच्याकडून १ लाख रुपयांचे न्यूजेनचे एपीआय क्रेडिट आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

द्वितीय क्रमांक : – “आयजीसी ६६४ इकोलूपर, भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे” यांना ६० हजार रुपये आणि ७५ हजार रुपयांचे न्यूजेनचे एपीआय क्रेडिट आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

तृतीय क्रमांक :- “आईजीसी ४१२ जेनिथ, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय” यांना ४० हजार रुपयांचे न्यूजेनचे एपीआय क्रेडिट आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच विशेष श्रेणी पुरस्कार पुणे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि आणि द सिटी विद्यापीठाच्या “आयजीसी १००३ टीम बीग एप्पल” यांना प्रत्येकी २० हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

डॉ. अंजली श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन आणि आभार डॉ. संदीप पाटील यांनी मानले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button