महाराष्ट्रक्रीडाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयसामाजिक

८ व्या राष्ट्रीय मास्टर गेम्स पोहण्याच्या स्पर्धेत रमेश जाधव यांना राष्ट्रीय सुवर्णपदक

जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेत प्रवेश निश्चित

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ३१ जानेवारी २०२६) सुपर मास्टर गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशन यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी चिंचवड येथे ८ व्या राष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक एकूण २३ खेळांचा समावेश आहे. पोहण्याच्या स्पर्धा २८ आणि २९ जानेवारी रोजी पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम जलतरण तलाव मध्ये घेण्यात आल्या.

यामध्ये ७० वर्षांपुढील पुरुष वयोगटातील पोहण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र, पुणे, मोशी येथील केंद्रीय विहार सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक रमेश जाधव (वय ७३ वर्षे) यांनी राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीमध्ये एका सुवर्ण पदकासह एकूण ४ पदकांची कमाई केली. रमेश जाधव यांनी २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये सुवर्ण पदक, २०० मीटर फ्री स्टाईल मध्ये रौप्य पदक आणि फ्री स्टाईल १०० मीटर व ५० मीटर मध्ये ताम्र पदक पटकावले. सुपर मास्टर गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशनचे कार्यकारी अधिकारी विनोद कुमार, महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग संघा, सरचिटणीस शैलेश फुलसुंगे यांच्या हस्ते रमेश जाधव यांना पदक देऊन गौरविण्यात आले. पोहण्याच्या स्पर्धेत ७० वर्षांपुढील पुरुष वयोगटात एकूण चार पदकांची कमाई करणारे रमेश जाधव हे महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धक आहेत. पुढील वर्षी जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम्स स्पर्धेत रमेश जाधव यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

रमेश जाधव हे केंद्र सरकारच्या भारतीय ऊस संशोधन लखनऊ संचालित प्रवरानगर येथील जैविक नियंत्रण केंद्रामध्ये कीटक शास्त्रज्ञ, वर्ग १, या पदावरून निवृत्त झाले आहेत. तरुण वयापासूनच त्यांना पोहण्याची आवड होती. यापूर्वी त्यांनी २००५ मध्ये प्रवरानगर येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत पोहण्याच्या स्पर्धेतत्यांनी ताम्र पदक आणि २०२५ मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ६ व्या महाराष्ट्र स्टेट मास्टर गेम्स स्पर्धेमध्ये पोहण्याच्या स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली होती.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button