महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी अभियंत्यांचे योगदान – लेफ्टनंट कॅप्टन सुमित कुमार भान

पीसीईटी कॅम्पसमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १८ ऑगस्ट २०२६) भारत देश कृषी, संरक्षण, ऊर्जा, सार्वजनिक दळणवळण व्यवस्था, पायाभूत सेवा सुविधा, समुद्र तसेच अंतराळ संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी अभियंत्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. उत्तम दर्जाचे संशोधक आणि अभियंते घडवण्याचे काम पीसीईटी सारख्या संस्था करत आहेत हे अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार लेफ्टनंट कॅप्टन सुमित कुमार भान यांनी काढले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी कॅम्पस मध्ये लेफ्टनंट कॅप्टन सुमित कुमार भान यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उप-संचालक डॉ. नीलकंठ चोपडे, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर, पीसीईटीचे डॉ. योगेश भावसार, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग संचालक संतोष पाचारणे, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात पीसीसीओई आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने देशभक्ती गीत सादर करण्यात आले.


——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button