शिवतेज नगर, श्री स्वामी समर्थ मंदिर येथे नागपंचमी उत्साहात साजरी
ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमीचे उत्कृष्ट आयोजन


पिंपरी, पुणे (दि. १७ ऑगस्ट २०२६) हिंदू धर्मातील सर्व सण निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित आहेत. त्यातीलच एक श्रावण महिन्यातील मुख्य सण म्हणजे नागपंचमी. नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते. यावर्षीची नागपंचमी श्रावणातील पहिल्या सोमवारी आल्यामुळे हा एक दुग्ध शर्करा योग आहे. शिवतेज नगर मधील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी महिलांसाठी नागपंचमी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रत्येकीला माहेरी आल्याची भावना निर्माण होत आहे मत नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी महिलांना नागपंचमीनिमित्त शुभेच्छा देताना व्यक्त केले.

शिवतेज नगर, चिंचवड येथील घरकुल चौकाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्रावण मास निमित्त नागपंचमी उत्सव आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांनी नाग प्रतिमेचे पूजन केले. तसेच पारंपरिक पद्धतीचा झिम्मा, फुगडी, फेर आणि नृत्य सादर करून झोके खेळण्याचा देखील आनंद घेतला. येथे नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. नागपंचमी हा महिलांचा सण, निसर्गातील प्रत्येक प्राण्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला होतो. पंचमीला यापूर्वी महिला आठवडाभर आधी माहेरी जात असत. विविध खेळ कार्यक्रम करत करायच्या असे महिला कार्याध्यक्ष सारिका रिकामे यांनी सांगितले.

नागाची प्रतिमा आणि कृत्रिम वारूळ तयार करून याची पूजा करण्यात आली आहे. दूध, पाणी, नारळ यामुळे नागांची हानी होऊ नये म्हणून येथे कृत्रिम वारूळ तयार केले आहे. नाग पंचमी महिलांसाठी जिव्हाळ्याचा सण आहे असे महिला उपाध्यक्ष अंजली देव यांनी सांगितले.

नागपंचमीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे की श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात होते तेव्हा कालिया नागाने यमुना नदीत खूप थैमान मानले होते. श्रीकृष्णाने याच दिवशी कालिया नागाचे मर्दन केले म्हणून नागपंचमी साजरी केली जाते असे कार्याध्यक्ष छाया महाजन यांनी सांगितले.

तसेच ज्येष्ठ महिला शांताबाई वायाळ, मंगल काळे यांनी पारंपरिक गाणी गायली.


यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायणराव बहिरवाडे, स्नेहा गुणवंत, क्षमा काळे, गीता पाटील, विद्या दुदुसकर, नीलिमा भंगाळे, स्मिता शिरसाट, अश्विनी केवाडकर, रेश्मा माधव आणि हरि नारायण शेळके काका, राजीव गुणवंत, दीपक बिरादार, चैतन्य बनकर, मेघराज बागी, रोहन नंदनवाड आदी उपस्थित होते.



——————————————————————–



