महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

एआय साठी जास्त रोजगार आणि गुंतवणूक भविष्यात भारतामध्ये – विवेक वेलणकर

एआय अँड एमएल साठी ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स, बीएससी (ऑनर्स) उपयुक्त - डॉ. संजय गांधी

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.१५ जून २०२६) एआय बाबत सर्वत्र उत्सुकता आणि भीती निर्माण झाली आहे. संगणक आणि मोबाईल ज्याप्रमाणे आपण सहजपणे स्वीकारला आणि आता ते आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे. त्याचप्रमाणे पुढील काळात एआय देखील सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक भाग असेल. भारत देश हा जगात या एआय वापरामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयटी कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित सेवा या सर्वात जास्त भारतात आहेत, त्यामुळे एआयशी संबंधित सर्वात जास्त रोजगार आणि गुंतवणूक भविष्यकाळात भारतामध्ये होईल अशी अपेक्षा करियर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली.

पुण्यातील ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स या संस्थेच्या आणि रायगड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (बाटु) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात वेलणकर बोलत होते. यावेळी बाटुचे कुलसचिव डॉ. अमित शेष, ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्सचे संस्थापक, सीईओ डॉ. संजय गांधी, आयआयटी वाराणसीचे डॉ. शैलेंद्र शुक्ला, रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचे उप व्यवस्थापक मंदार हलभावी, उद्योजक मनोज देशमुख आणि प्रशांत पुंड आदी उपस्थित होते.

विवेक वेलणकर यांनी सांगितले की, शिक्षण, शेती, उद्योग, सेवा, वैद्यकीय, वाणिज्य कला अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे कोडींग, प्रोग्रॅमर यांची नोकरी धोक्यात येईल. परंतु एआय चे टूल विकसित करणारे, एमएल साठी काम करणारे यांना मागणी वाढेल. विद्यार्थी व पालकांनी कॉलेज निवडताना कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप याला महत्व दिले पाहिजे त्यासाठी ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स हा सक्षम पर्याय आहे.

डॉ. अमित शेष यांनी सांगितले की, रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आणि पुण्यातील ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स या संस्थेबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग बीएससी (ऑनर्स) या अभिनव पदवी अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या विद्यापीठाच्या वतीने ट्रिपल आयटी, अलाहाबाद या संस्थांबरोबर देखील करार केला आहे. विद्यार्थ्यांना पदवी बरोबर उद्योगात अनुभव मिळावा यासाठी विद्यापीठ समन्वय साधत आहे. या विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत ९२ स्टार्टअप सुरू करण्यात आले आहेत. तसेच नॅशनल इंक्युबेशन स्टार्टअप पॉलिसी अंतर्गत या विद्यापीठाने प्रत्येक वर्षासाठी २५ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असेही आवाहन डॉ. अमित शेष यांनी केले.

स्वागत, प्रास्ताविक करताना डॉ. संजय गांधी यांनी सांगितले की, पुण्यातील ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नुसार काम करीत आहे. संस्थेने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त स्टार्टअप साठी मार्गदर्शन केले आहे.”बाटु” बरोबर सुरू होणाऱ्या बारावी नंतर चार वर्षाच्या “आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीएससी (ऑनर्स)” हा अभिनव पदवी अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे टेक्नॉलॉजी विभागात सुरू करण्यात आला आहे या मध्ये एआय अधिक कॉन्टम कम्प्युटरचे ज्ञान मिळणार आहे. तसेच चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी उद्योगात इंटर्नशिप देण्यात येईल. या इंटर्नशिप कालावधी मध्ये स्टायपेंट मिळणार असून इंटर्नशिप संपल्यानंतर कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या १२ अधिक ४ वर्षाच्या पदवीचा परदेशात पदवीधर शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी उपयोग होईल अशी माहिती डॉ. संजय गांधी यांनी सांगितले.

सूत्र संचालन समिधा गांधी, आभार अमित गांधी यांनी मानले.
———————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button