महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयराष्ट्रीयसामाजिक

पिंपरी कॅम्प मधील रस्ता आता १५ मीटर होणार – अण्णा बनसोडे

व्यापाऱ्यांच्या एकजुटीचा विजय - श्रीचंद आसवानी

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. १० जून २०२६) पिंपरी कॅम्प मधील साई चौक ते शास्त्री उद्यान हा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या परिसरात रस्ते मोजणी करण्यात येणार आहे. हा रस्ता १८ मीटर ऐवजी १५ मीटर रुंद करावा या व्यापाऱ्यांच्या मागणीला आयुक्तांनी सहमती दर्शवली आहे अशी माहिती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिली.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत ऑटो क्लस्टर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. नगरसेवक डब्बू आसवानी, पिंपरी चिंचवड मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, नगरसेवक सविता आसवानी, जेष्ठ नेते धनराज आसवानी, जीतू मगतानी, जॉनी थडानी, सुरेश धनवानी, अमर बजाज, पेहलाज वाधवानी, मनोहर जेठवाणी, गोपी धनवाणी, दिनेश मुलचंदानी, आशा धनवाणी, गणेश चटले यांच्या समवेत २०० व्यापारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

हा रस्ता १८ मीटर रुंदीकरण केल्यानंतर येथील व्यापाऱ्यांना व्यवसाय व राहण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. मागील बाजूला रेल्वे लाईन असल्यामुळे अरुंद पट्टा शिल्लक राहील. यासाठी मागील अनेक दिवसांपासून हे रुंदीकरण १५ मीटर करण्यात यावे, यासाठी पिंपरी चिंचवड मर्चंट फेडरेशनच्या माध्यमातून श्रीचंद आसवानी, डब्बू आसवानी यांनी पाठपुरावा केला होता.

या बैठकीत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आश्वासन दिले की, व्यापाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधी व पिंपरी चिंचवड मर्चंट फेडरेशनच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या ठिकाणी १५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी मोजणी करण्यात येईल.

श्रीचंद आसवानी सांगितले की, पिंपरी कॅम्प मधील साई चौक ते शास्त्री उद्यान हा रस्ता १५ मीटर रुंदीकरणासाठी लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांनी होकार दिला आहे. सर्व व्यापाऱ्यांच्या एकजुटीमुळे ही मागणी प्रशासनाने मान्य केली. व्यापाऱ्यांनी अशीच एकी दाखवून पिंपरी कॅम्पातील इतर समस्या सोडवण्यासाठी पाठबळ द्यावे असे श्रीचंद आसवानी यांनी सांगितले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button