महाराष्ट्रकलाचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विवान पाटील याला ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ७ मे २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विवान पाटील याला चित्रकलेचा राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय श्रेणी मधील ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’ मिळाला आहे. प्राथमिक व माध्यमिक मधील विद्यार्थ्यांच्या चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील “कलादर्पण” या संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गटात दरवर्षी चित्रकला स्पर्धा घेण्यात येतात. या वर्षीच्या ४ थ्या राष्ट्रीय कलादर्पण चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर एकूण २२ विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड करण्यात आली होती. यामध्ये ११ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी आणि इतर ११ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी चे पारितोषिक देण्यात आले.

प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांना ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’ आणि स्मृतीचिन्ह व मोबाईल भेट देण्यात आला. द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांना ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’ आणि स्मृतीचिन्ह व सायकल भेट देण्यात आली. हा पुरस्कार मिळवणारा विवान पाटील हा एस. बी. पाटील स्कूलचा पहिलाच विद्यार्थी आहे.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, शाळेच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांनी विवान पाटील याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

विवान पाटील याला चित्रकला शिक्षक कुलदीप घाडगे यांनी मार्गदर्शन केले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button