महाराष्ट्रअंतरराष्ट्रीयचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

हॅकेथॉन स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला चालना – भास्कर रेड्डी

पीसीसीओई येथे केविस्टा टेक्नॉलॉजी हॅकेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २४ फेब्रुवारी २०२६) कॅव्हिस्टा टेक्नॉलॉजीज हॅकेथॉन स्पर्धेमधून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला चालना मिळते. तसेच एखादी समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करून त्यावर निश्चित पर्याय शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आजच्या तरुण अभियंत्यांमधील संशोधक व चिकित्सक वृत्ती पाहता ते तंत्रज्ञानाद्वारे जागतिक पातळीवर भारताचे नाव पुढे नेतील असे प्रतिपादन कॅव्हिस्टा टेक्नॉलॉजीजचे महाव्यवस्थापक भास्कर रेड्डी यांनी केले.

कॅव्हिस्टा टेक्नॉलॉजीज आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे कॅव्हिस्टा टेक्नॉलॉजीज हॅकेथॉन या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रेड्डी बोलत होते. यावेळी पीसीईटी प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे, सिस्टर बीके रितू ठक्कर, मीनल मुंदाडे, नेत्रा दीदी, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. विजय माने, एमआयटीच्या नेहा हजारे, कॅविस्टा टेक्नॉलॉजीजचे डायरेक्टर पीपल ऑपरेशन्स नीरज शर्मा आणि कॅविस्टा टेक्नॉलॉजीजचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स तानिया शरण, संपर्क व्यवस्थापक शालिनी राव आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या टीम सिनोरा (७५ हजार रुपये), द्वितीय क्रमांक – आळंदी येथील एमआयटी टीम अरोरा (५० हजार रुपये), तृतीय क्रमांक – व्हीआयटी टीम टेक तडका (३० हजार रुपये) आणि उत्तेजनार्थ पीसीसीओईची टीम व्हिजनरी २.० यांना रोख बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कॅविस्टा टेक्नॉलॉजीज हॅकेथॉन स्पर्धा पुण्यासह अमेरिकेतील डलास, नायजेरिया आणि बोत्सवाना येथेही घेण्यात आल्या. ही कंपनी डॅलस, टेक्सास येथे मुख्यालय असलेल्या होम हेल्थकेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचे जागतिक तंत्रज्ञान भागीदार म्हणूनही काम करते असे कॅविस्टा टेक्नॉलॉजीजचे महाव्यवस्थापक भास्कर रेड्डी यांनी सांगितले.

पीसीइटीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले की, भारतीय तरुण आज जगभर बदल घडवून आणत आहेत. पुढील दशकांमध्ये आपण तंत्रज्ञानाद्वारे जगावर राज्य करू. एवढी नाविन्यता, प्रगल्भता आणि सृजनशीलता भारतीय तरुणांमध्ये आहे.

सिस्टर बीके रितू ठक्कर यांनी “नवोपक्रम सर्जनशीलता आणि उत्कृष्ट कामगिरी” या विषयावर मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन नीरज शर्मा, आभार तानिया शरण यांनी मानले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
—————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button