महाराष्ट्रचिंचवडतंत्रज्ञानपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

पीसीसीओईआर आयोजित राष्ट्रीय रोबोराष्ट्र २०२६ स्पर्धेत एक लाख नव्वद हजार रुपयांची पारितोषिके वाटप

Spread the love

पिंपरी, पुणे (दि. २३ फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) आयोजित संगणक अभियांत्रिकी विभागाच्या रोबोहॉक क्लबच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सव स्पर्धा “रोबोराष्ट्र २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचे सहाय्यक उपाध्यक्ष सुनील मेहता यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या स्पर्धेत भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि शाळांमधून १२० पेक्षा अधिक संघ आणि ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वरिष्ठ श्रेणी, कनिष्ठ श्रेणी, रेस्क्यूलिंपिक्स ३.० आणि चक्रव्यूह या चार विभागांमध्ये तांत्रिक स्पर्धा घेण्यात आल्या. चारही विभागातील प्रथम तीन विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते एकूण १,९०,००० रुपयाची पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोबोराष्ट्र २०२६ या राष्ट्रीय स्पर्धेला मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया यांनी शीर्षक प्रायोजक, व्हेंटेक ऑटोमेशन अँड रोबोटिक्स प्रा. लि. प्लॅटिनम प्रायोजक, बँक ऑफ महाराष्ट्रने गोल्ड प्रायोजक, अनस्टॉपन प्लॅटफॉर्म पार्टनर म्हणून सहभाग घेतला.

उद्घाटन प्रसंगी पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पीसीइटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीन डॉ. शितलकुमार रवंदळे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. विजय कोतकर, मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया येथील सहाय्यक उपाध्यक्ष सुनील मेहता, वेंटेक ऑटोमेशन अँड रोबोटिक्स प्रा. लि. चे सागर कोंढरे व योगेश एकशिंगे तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे साबीर अली शेख व रविंद्र सोनजे, समन्वयक डॉ. महेंद्र साळुंखे, प्रा. पल्लवी कुलकर्णी व प्रा. वृषाली देवर आदी उपस्थित होते. संस्थेचे सर्व डीन आणि विभाग प्रमुख यांनीही ह्या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

या स्पर्धेत वरिष्ठ श्रेणी मध्ये प्रथम क्रमांक :- मुंबई येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळाचे द्वारकादास जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील टीम सोल्डर अँड फॉरगेट; द्वितीय क्रमांक :- ग्वाल्हेर येथील माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सची टीम पीआयएल डायनॅमिक्स आणि तृतीय क्रमांक :-पुणे, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची टीम ड्रेइक यांनी मिळवला.

कनिष्ठ श्रेणी मध्ये प्रथम क्रमांक :- पुणे येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक १ मधील टीम कोड स्टॉर्म्स; द्वितीय क्रमांक :- नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल मधील टीम एव्हीएसएस आणि तृतीय क्रमांक :- पुणे येथील संस्कृती स्कूलच्या टेकफोर्स टीमने मिळवला.

रेस्क्युलॅम्पिक्स या विभागातील स्पर्धेत प्रथम क्रमांक :- कोयम्बतूर येथील केपीआर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या टीम उविरा झेड पटकावला; तर द्वितीय क्रमांक :- आकुर्डी, पुणे डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ची टीम टेक ओव्हर आणि तृतीय क्रमांक :- लोणावळा, पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी टीम आयआयसी एसआयटी यांना मिळाला.

चक्रव्यूह विभागात प्रथम क्रमांक :- जेएसपीएमच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग; द्वितीय क्रमांक :- लोणावळा, पुणे येथील सिंहगड सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी टीम इम्पोस्टर आणि तृतीय क्रमांक :- न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या टीम बर्म्युडा ब्लास्टर यांनी प्राप्त केला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button