एसबीपीआयएम च्या ‘युवोत्सव’ चे उद्घाटन सोमवारी

पिंपरी, पुणे (दि. १९ फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या वतीने आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा ‘युवोत्सव–२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार, दि.२३ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या युवोत्सव चे हे अकरावे वर्ष आहे. सोमवारी, (दि.२३ फेब्रुवारी) सकाळी ९.३० वाजता पीसीइटी लॉन, निगडी येथे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे.

यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पद्मश्री, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, पिंपरी चिंचवड मनपा उपायुक्त ममता शिंदे, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालक डॉ. किर्ती धारवडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या क्रीडा युवोत्सवात फुटबॉल, व्हॉलीबॉल, आयपीएल लिलाव स्पर्धा आणि बॉक्स क्रिकेट (मुले व मुली) अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. “युवाशक्तीचे वर्चस्व” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली संपन्न होणारा हा तीन दिवसीय क्रीडा महोत्सव युवकांमध्ये क्रीडा नेतृत्वगुण, संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास वाढविण्यास प्रेरणादायी ठरणार आहे.
युवोत्सव हा एसबीपीआयएम चा प्रमुख वार्षिक उपक्रम असून, गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने यशस्वीपणे आयोजित केला जात आहे. या क्रीडा महोत्सवात महाराष्ट्र राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधून ९० हून अधिक संघ व सुमारे १००० पेक्षा अधिक विद्यार्थी खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच पीसीइटी अंतर्गत कार्यरत विविध संस्थांमधील ७००० हून अधिक विद्यार्थी प्रेक्षक या स्पर्धांचा आनंद घेणार आहेत. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडाविषयक मंच उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
——————————————————————–



