अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड च्या वतीने दीपोत्सव

पिंपरी, पुणे (दि. ०५ नोव्हेंबर २०२५) कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त चिंचवड गावातील श्री विठ्ठल मंदिरात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड च्या वतीने दीपोत्सवाचे साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, अभय कुलकर्णी, शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, ब्रह्म उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष राजन बुडूख, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, प्रदेश चिटणीस संजय परळीकर, सचिव पवन वैद्य, सुषमा वैद्य, शहर कार्याध्यक्ष महेश बारसावडे, सरचिटणीस आनंद देशमुख, शामकांत कुलकर्णी, आनंद देशमुख, महिला अध्यक्ष संध्या कुलकर्णी, वैभव खरे, आरती खोसे, वैशाली कुलकर्णी, कविता बारसावडे व महासंघाचे इतर पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
——————————————————————



