महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेसामाजिक
सुशीला जगताप यांचे निधन

पिंपरी – (दि. ३ ऑगस्ट २०२५) आकुर्डी गावातील ज्येष्ठ नागरिक सुशीला चिंतामण जगताप (वय ८४ वर्षे) यांचे रविवारी (दि.३) सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी रमेश जगताप आणि सुभाष जगताप यांच्या त्या मातोश्री होत. अमरधाम निगडी स्मशानभूमी येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनपाचे अधिकारी, कर्मचारी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
——————————————————————
त्यांचा पुण्यानुमोदन दिन गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता, विश्वरत्न बुद्ध विहार आकुर्डी गाव येथे होणार आहे.
——————————————————————




