महाराष्ट्रआरोग्यचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेभोसरीराजकीयसामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी मोशी येथे धनश्री हॉस्पिटलचे उद्घघाटन

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.४ फेब्रुवारी २०२५) डॉ. पटवर्धन यांचे मोशी येथील अद्ययावत धनश्री हॉस्पिटल या १०१ बेडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन गुरुवारी (दि.६ फेब्रुवारी) दुपारी एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक डॉ. सलोनी पटवर्धन यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

यावेळी खा. श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, दिलीप वळसे पाटील, अण्णा बनसोडे, शरद सोनवणे, शंकर जगताप, बाबाजी काळे, अमित गोरखे, उमाताई खापरे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर नितीन काळजे व राहुल जाधव, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे, भायखळा विधानसभा अध्यक्ष भाजपा नितीन बनकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

मोशी आळंदी बीआरटी रस्ता, क्लासिओ हॉटेल शेजारी सुरू होणाऱ्या या अद्यावत रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी कॅथ लॅब, अँजिओप्लास्टी, रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंट, स्त्रीरोग, बाल रोग, आयव्हीएफ सेंटर, ३० बेडचे आयसीयू, पीआयसीयु, एनआयसीयु, प्रसुती विभाग, ६ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, २४ तास सिटीस्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी, २४ तास एक्सीडेंट व ट्रॉमा सेंटर, दुर्बीणद्वारे मणक्याची शस्त्रक्रिया आदी रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती डॉ. राजीव पटवर्धन व डॉ. अपूर्व पटवर्धन यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button