महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेराजकीयसामाजिक

विधानसभा निवडणूक प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करा – डॉ. कैलास कदम

लोकशाहीच्या रक्षणासाठी पिंपरी मध्ये काँग्रेसचा मोर्चा

Spread the love

पिंपरी, पुणे (दि.२७ जुलै २०२५) महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. निवडणुकीपूर्वी अवघ्या पाच महिन्यांत ४१ लाख नव्या मतदारांची झालेली वाढ आणि मतदानाच्या आकडेवारीत ८ टक्के तफावत निदर्शनास आली आहे. आयोगाचा हा सर्व संशयास्पद प्रकार म्हणजे निव्वळ ‘डेटा मॅनिप्युलेशन’ आहे. या विषयी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे वेळोवेळी तक्रार केली आहे. त्याची दखल घेत नाही, त्यामुळे आता या विधानसभा निवडणूक प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. यासाठी काँग्रेसच्या वतीने सर्वत्र मशाल मोर्चा काढून जनजागृती करण्यात येत आहे त्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधी निषेध नोंदवावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

शहर काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. २६ जुलै) पिंपरीत मशाल मोर्चा काढण्यात आला. या मशाल मोर्चात शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक मोरे, भाऊसाहेब मूगुटमल, वाहब शेख, शहाबुद्दीन शेख, मयूर जयस्वाल, ॲड. अनिरुध्द कांबळे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, अबूबकर लांडगे, भारती घाग, निर्मला खैरे, सचिन कोंढरे, महेश पाटील, अमरजीत सिंग पोथीवाल, राहुल शिंपले, अरुणा वानखडे, जनदबी सय्यद, आशा भोसले, सीमा यादव, आशा बोरकर, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, राणी निंबाळकर, सुरेखा मिसाळ, सविता चव्हाण, पल्लवी गायकवाड, तब्बसुम शेख, पूनम इंगळे, आरती खरात, अंकिता मानकर, सोनाली शिंदे, मजहर खान, वसंत वावरे, मिलिंद फडतरे, फिरोज तांबोळी, भिमराव जाधव, बाबूलाल वाघमारे, ॲड. अनिकेत रसाळ, सतीश भोसले, बाबासाहेब पाटील, सुरज कोथींबीरे, सचिन पवार, हसन पटेल, फिरोज मुलाणी, इमरान शेख, आशुतोष खैरे, अमित मोरे, गणेश बंदपट्टे आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डॉ. कैलास कदम म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे ठाम मत आहे की, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवरील जनतेचा विश्वास टिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी त्वरित व्हावी, तसेच महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा त्वरित रद्द करावा व शासनाने जनसुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा अशीही मागणी डॉ. कैलास कदम यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button